Homeसामाजिकजगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखीचे मोशी येथे बारणे कुटुंबाच्या वतीने...

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखीचे मोशी येथे बारणे कुटुंबाच्या वतीने भव्य स्वागत

पिंपरी चिंचवड : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखीचे सोमवारी सकाळी 10 वाजता मोशी येथे बारणे कुटुंबाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

या वर्षी संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचा ३४० वा वर्ष होता. सलग ३५ दिवसांच्या आध्यात्मिक यात्रेनंतर, तब्बल १७ वर्षांनी आळंदी येथे दुसऱ्यांदा मुक्काम करून पालखीने मोशी नगरीत प्रवेश केला. यावेळी प्रसिद्ध बैलगाडा मालक सिताराम बारणे, अनंता बारणे, प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे, उद्योजक आतिश बारणे, उद्योजक शिवाजी बारणे, उद्योजक सचिन बारणे, उद्योजक अक्षय बारणे यांच्या कुटुंबीयांनी पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक, वारकरी आणि स्थानिक ग्रामस्थ उत्साहात सहभागी होते.

यावेळी बारणे कुटुंबाच्या वतीने आलेल्या सर्व वारकरी बंधू भगिनींना चहा पाणी नाष्टा देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

पुंडलिक वरदे हरि विठ्ठल…” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. मंडपात मानकरी, सेवेकरी, दिंडीचालक यांचा श्रीफळ व प्रसाद देऊन बारणे कुटुंबाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सोहळा प्रमुख ह.भ.प. दिलीप महाराज मोरे, जालिंदर महाराज मोरे, गणेश महाराज, वैभव महाराज, विक्रमसिंह महाराज, उमेश महाराज, लक्ष्मण महाराज मोरे, शशी मोरे आणि इतर मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!