Homeसामाजिकजनतेला गुलामगिरीची जाणीव करून देत त्यांना लढण्याचे बळ क्रांतिसिंह नाना पाटील यांनी...

जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देत त्यांना लढण्याचे बळ क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दिले. प्रवीण माने यांचे प्रतिपादन

जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देत त्यांना लढण्याचे बळ क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दिले. प्रवीण माने यांचे प्रतिपादन

तळेगाव दाभाडे : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करण्यात आले .यावेळी बोलताना नगरपरिषदेचे कर्मचारी प्रवीण माने म्हणाले की ब्रिटिशांना क्रांतिसिंह नाना पाटलांना पकडण्यासाठी बक्षीस लावलं जंगजंग पछाडलं पण नाना पाटील ब्रिटिशांना सापडले नाहीत.

संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार म्हणून नाना पाटील यांचा उल्लेख केला जातो. इंग्रज राजवटीत दीड हजार गावात नाना पाटील यांनी प्रति सरकार चालविले. सांगली व महाराष्ट्र भागात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करत इंग्रज शासनाला आव्हान देत प्रतिसरकार( पत्री सरकार) स्थापन करणारे पहिले स्वतंत्र सेनानी म्हणून क्रांतिसिंह नाना पाटलांकडे पाहिले जाते. जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देत त्यांना लढण्याचे बळ क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दिले.

वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेल्या नानांची भाषणे नागरिकांना प्रभावीत करीत होती आणि त्यातूनच लोकांना प्रेरणा मिळाली. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वतंत्र चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे स्वतंत्र चळवळीतील प्रमुख कार्य होते. असे प्रतिपादन प्रवीण माने यांनी केले.

नगरपरिषदेचे जेष्ठ कर्मचारी अनिल इंगळे यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांना स्मरून सामाजिक न्याय आणि लोकसेवेच्या कार्यासाठी प्रेरणा घेण्याचा संकल्प सर्व कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी. प्रवीण माने, निरंजन भेगडे, आकाश ओव्हाळ, विशाल मकवाना, विष्णू मकवाना, मंगेश मोईकर यांच्यासह नगर परिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!