डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरामध्ये तोडफोड करणाऱ्या वर ॲट्रॉसिटी दाखल करा. मावळ वंचित बहुजन आघाडीची मागणी
लोनावळा : शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये १४ ऑगस्ट २०२५ रोजी एका तरुणाने हातोडी च्या साह्याने तोडफोड केली. यासंदर्भात सदरील तरुणावर ॲट्रॉसिटी कलमांतर्गत कारवाई करावी तसेच या घटनेचा कशाप्रकारे तपास केला याची संपूर्ण माहिती लोणावळा पोलिसांनी जनतेसमोर सादर करावी तोडफोड करणाऱ्या तरुणावर कोणती कलमे लावण्यात आली आहे याची संपूर्ण माहिती चार-पाच दिवसात लोणावळा पोलिसांनी द्यावी.
या मागणीचे निवेदन नुकतेच मावळ वंचित बहुजन आघाडीने लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघारे यांना दिले आहे तसेच या घटनेच्या तपासाची दिशा व त्या संदर्भातील असणाऱ्या घडामोडी जनतेला चार-पाच दिवसात सांगाव्या. या घटनेचा तपास न झाल्यास लोणावळा पोलीस स्टेशन मध्ये धरणे आंदोलन करू असा इशारा मावळ वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
सदर निवेदन देताना नितीन मारुती ओव्हाळ, मावळ तालुका अध्यक्ष व ज्येष्ठ नेते प्रकाश गायकवाड, संतोष लोखंडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष, युवा अध्यक्ष संदीप कदम, महिला अध्यक्षा मनीषा ओव्हाळ, मावळ तालुका संपर्कप्रमुख भरत गुप्ते, लोणावळा शहर युवा अध्यक्ष करण भालेराव मावळ तालुका उपाध्यक्ष सुनील वाघमारे, सचिव लहू भाऊ लोखंडे, महिला महासचिव हर्षदा गजरमल, मावळ तालुका संघटक अर्जुन मोरे, ज्येष्ठ नेते शिवराम कांबळे युवा सचिव अक्षय साळवे, युवा उपाध्यक्ष बब्रुवन कांबळे, प्रविण भवार, लोनावळा शहर उपाध्यक्ष वसीम खान, शहर संघटक मिलिंद गुप्ते, सुमित साळवे, संतोष सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे पदाधिकारी त्याचप्रमाणे तालुक्याचे पदाधिकारी व शहराचे पदाधिकारी. महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















