Homeसामाजिकतळेगाव मध्ये हिंदू वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

तळेगाव मध्ये हिंदू वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

तळेगाव मध्ये हिंदू वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

तळेगाव दाभाडे : येथे राणा राजपूत समाज महाराणा प्रतिष्ठान तर्फे हिंदू वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची ४८५ वी जयंती गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता शहरातील डाळ आळी मधील श्री दत्त मंदिरा मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा बसंतीताई रजपूत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिव्यांग सेल मावळ च्या अध्यक्षा सौ ज्योतीताई राजीवडे. सामाजिक कार्यकर्ते भरत नाना राजीवडे. यांच्या हस्ते हिंदू वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी मयूर डाळवाले, आकाश डाळवाले, स्वप्निल सानंदा, प्रशांत हिरवणे, केदार राणा( सीतापुरे) अक्षय राणा, प्रसाद राणा, मंगेश डाळवाले, संभाजी परमार, मनीष डाळवाले, प्रमोद डाळवाले, योगेश सीतापुरे यांच्यासह अनेक महिला भगिनी यावेळी उपस्थित होत्या. डाॅ गौरव धुंदके यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या शौर्य गाथेवर मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात डॉ धुंदके म्हणाले की १५७६ मध्ये हल्दीघाटी येथे महाराणा प्रताप आणि मोगल बादशहा अकबरामध्ये युद्ध झाले होते.

जे संपूर्ण जगासाठी आजही आदर्श आहे. महाराणा प्रताप यांनी अत्यंत बलशाली अशा मोगल बादशहा अकबराच्या ८५००० सैनिकांच्या विशाल सैन्यासमोर आपल्या केवळ २०००० सैनिक आणि तोकड्या़ शस्त्रास्त्राच्या आधारे अनेक वर्ष संघर्ष केला. सलग ३० वर्षाच्या प्रयत्नानंतरही अकबराला महाराणा प्रताप यांना बंदी बनवता आले नाही. एवढेच नाही तर महाराणा प्रताप यांच्या निधनाची बातमी ऐकून अकबर देखील रडला होता.

अकबराने महाराणा प्रताप यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता की तुम्हाला मी अर्धा हिंदुस्तान देतो तुम्ही मला सामील व्हा परंतु महाराणा प्रताप यांनी अकबराचा हा प्रस्ताव नाकारला. महाराणा प्रताप यांचा भाला ८१ किलो वजनाचा होता तर त्यांच्या छातीच्या कवचाचे वजन ७२ किलो होते. भाला. कवच. ढाल आणि दोन तलवारी सह एकूण २०८ किलोचे वजन घेऊन ते युद्ध करायचे. महाराणा प्रताप यांचे वजन ११० किलो आणि उंची ७ फुट ५ इंच होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय डाळवाले यांनी केले. तर आभार अॅड रोहित डाळवाले यांनी मानले.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!