मावळमध्ये अवकाळी पाऊसामुळे शेतीचे मोठे नुकसान
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात मागील चार दिवसापासून अवकाळी पाऊस पडत असल्याने उन्हाळी बाजरी पिक धोक्यात आले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पाऊसामुळे काढणीस आलेले तयार बाजरीचे पीक व मका तसेच फरसबी शेतात आडवे झाले आहेत. यामुळे मावळ मधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाले सोबत अन्य शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मावळ तालुक्यात उन्हाळ्यात पाण्याची सोय असलेले शेतकरी बाजरीचे आणि भुईमुगाचे तसेच बागायती भाजीपाल्याचे पिके घेतात. साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात बाजरी. भुईमूग पिकांची पेरणी होते. सध्या बाजरी काढण्याचा काळ असून शेतकरी पिक काढण्याची तयारी करत होते मात्र अचानक झालेल्या अवकाळी पाऊसाने शेतातील उभ्या पिकाला पाऊसाचा चांगलाच फटका बसला आहे.
पिके शेतातच आडवे झाले असून तयार बाजरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊसाचा जोर सतत वाढत राहिल्याने शेतीचे नुकसान होते. त्याचा पंचनामा करावा अशी मागणी महिला शेतकरी सुनंदा खांडभोर यांनी केली आहे. याविषयी बोलताना महिला शेतकरी सुनंदा खांडभोर म्हणाल्या की सध्या बाजरी काढणीला आली होती. अवकाळी पाऊस पडल्याने बाजरी काढता आली नाही. परिणामी मोठे नुकसान झाले. तर दुसरीकडे भात लावणी पूर्वी भाजणी करणे. रोप टाकायला दाढ करणे. कुळवणी. नांगरणी अशी ही कामे खोळंबली आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















