Homeराजकीयमावळमध्ये बदलाचे संकेत! तळेगाव कार्यक्रमातून नवीन राजकीय समीकरणांची चाहूल

मावळमध्ये बदलाचे संकेत! तळेगाव कार्यक्रमातून नवीन राजकीय समीकरणांची चाहूल

तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) –तळेगाव नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात, तसेच आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात, मावळ तालुक्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आमदार सुनील शेळके यांनी युतीसाठी “एक हात पुढे करतो” अशी भूमिका मांडत सौहार्दपूर्ण संदेश दिला, तर माजी आमदार बाळा भेगडे यांनी तत्काळ प्रतिसाद देत “तुम्ही एक हात पुढे केला तर मी दोन हात पुढे करतो” असे वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.

या परस्पर संवादामुळे मावळ तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. भेगडे यांनी पुढे बोलताना म्हटले की, “आपण तालुक्यात बिनविरोध निवडणुका घेऊ, मतभेद विसरून विकासासाठी एकत्र काम करुया.”

राजकीय जाणकारांच्या मते, या दोन्ही नेत्यांमधील अशा सौहार्दपूर्ण वातावरणामुळे महायुती किंवा सहकार्याच्या नव्या शक्यता निर्माण होत आहेत. मावळ तालुक्यात गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिंदे गट या तिन्ही गटांमधील स्पर्धा तीव्र राहिली असताना, आता या संवादामुळे नव्या समजुतीचा प्रारंभ होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. लोकार्पण कार्यक्रमानंतर झालेल्या परस्पर संवादामुळे तालुक्याच्या राजकीय रंगमंचावर “नवीन युतीचा पाया रचला जातोय का?” असा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात आहे.

मावळमध्ये सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी निवडणुकांपूर्वी या दोन्ही नेत्यांच्या हालचालींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!