लोणावळा : लोणावळ्यातील जगप्रसिद्ध कैवल्यधाम योग संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी योगमय पोलीस आणि फिलॉसॉफी ऑफ योगा या पुस्तकाचे प्रकाशन पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले आयुष मंत्रालयाच्या योग संगम उपक्रमांतर्गत आणि एक पृथ्वी एक आरोग्य या प्रेरणादायी थीमनुसार जगप्रसिद्ध कैवल्यधाम योग संस्थेमध्ये शनिवार दिनांक १२ जून २०२५ रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाईव्ह संदेशाने झाली. त्यानंतर साधक रामदास यांच्या शंख नादाने वातावरण प्रसन्न झाले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाच्या औपचारिक समारंभ कोल्हापूर विभागाचे विशेष महा निरीक्षक(IG) सुनील फुलारी यांनी केला. कैवल्यधाम चे मानध सचिव आणि CEO सुबोध तिवारी, प्रोफेसर रणजितसिंग भोगल, ब्रिगेडियर सुहास धर्माधिकारी, डाॅ मेघना पटेल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सकाळी ७ ते ८ या वेळेत कुडीलाल सक्सेरिया हाॅल १ व २ येथे योगाभ्यास घेण्यात आला. हे सत्र वरिष्ठ योग शिक्षक कुमारी पूर्वा सातकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी साधकांबरोबरच नागरिक. पोलीस अधिकारी. विद्यार्थी. लायन्स क्लब ऑफ लोणावळा प्रतिनिधी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कैवल्यधाम योग संस्थेतर्फे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना शाल आणि कॉफी टेबल बुक देऊन सन्मानित करण्यात आले. कैवल्यधाम योग महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ शरदचंद्र भालेकर लिखित योगमय पोलीस आणि डाॅ स्टुअर्ट रोझ व स्वामी महेशनंदजी लिखित फिलॉसॉफी ऑफ योगा या पुस्तकाचे प्रकाशन पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाच्या निमित्ताने कैवल्यधाम मधील योग प्रशिक्षकांनी ऑर्डनन्स कॅम्प देहूरोड. द ग्रेट ईस्टर्न अकॅडमी.नवल फॅडेट्स लोणावळा. एल अँड टी लर्निंग सेंटर. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा. आय एन एस शिवाजी. कैवल्य विद्यानिकेतन स्कूल. टाटा पावर हाऊस वलवन. खोपोली पावर हाऊस.भिरा पावर हाऊस.फरियास रिसॉर्ट लोणावळा या ठिकाणी योगा सामान्य प्रोटोकॉल प्रमाणे योगाचे प्रशिक्षण दिले. जागतिक योग दिनानिमित्त कैवल्यधाम योग संस्थेमध्ये मोठ्या संख्येने साधक व नागरिक यावेळी उपस्थित होते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















