श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडगाव, या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा
वडगांव मावळ : भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडगाव, या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता अनेक लहान मुले विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करून आले होते.
इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या साडेसातशे वारकरी वेशातील विद्यार्थ्यांची पायी दिंडी टाळ मृदुंग समवेत ज्ञानोबा माऊली तुकाराम गजर करत शाळेपासून पोटोबा मंदिरा पर्यंत उत्साहात पोहोचली मंदिर परिसरात इयत्ता नववी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक नृत्य सादर केली मुलांना नृत्य सादरीकरणासाठी शिक्षिका अक्षया गरुड, निशा चौधरी ,सुप्रिया बनकर, आयेशा शेख श्री गणेश जगदाळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब म्हाळसकर, उपाध्यक्ष सचिन नारायण ढोरे, सचिव राजेंद्र पांडुरंग वहिले, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर मॅडम, व्यवस्थापक आदिनाथ आगळमे, क्रीडाशिक्षक अभिषेक भालेराव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




















