विकास लालगुडे यांची सांगवी गाव राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी निवड
सांगवी (ता. मावळ): सांगवी गावातील समाजप्रिय कार्यकर्ता विकास लालगुडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगवी गाव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी जाहीर केली व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

या वेळी आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, “सांगवी गावातील पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तरुण, कार्यक्षम आणि लोकहिताची दृष्टी असणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे. विकास लालगुडे हे त्यासाठी योग्य व्यक्ती आहेत,” असे मत व्यक्त केले.

नवीन अध्यक्ष विकास लालगुडे यांनी पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगवी गावात पक्षाची भूमिका प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्याचा संकल्पही केला.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीबद्दल गावभर आनंदाचे वातावरण असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





















