Homeशिक्षण-प्रशिक्षणबालकांची स्वसंरक्षणजाणीव पक्की करण्यासाठी सह्याद्री स्कूलचा उपक्रम

बालकांची स्वसंरक्षणजाणीव पक्की करण्यासाठी सह्याद्री स्कूलचा उपक्रम

बालकांची स्वसंरक्षणजाणीव पक्की करण्यासाठी सह्याद्री स्कूलचा उपक्रम

तळेगाव दाभाडे : आजच्या बदलत्या सामाजिक वातावरणात मुलांनी सुरक्षित कसे राहावे, स्वतःचे संरक्षण कसे करावे, धोकादायक परिस्थितीत कोणती पावले उचलावी याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे मार्गदर्शनपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शालेय वयातील मुलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श यामधील फरक समजावून सांगण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांशी संवाद साधत दैनंदिन जीवनात मुलांना कोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो, अशा वेळी शरीराची मर्यादा, वैयक्तिक अवकाश आणि ‘नो-टच झोन’ याबद्दल उदाहरणांसह माहिती देण्यात आली. त्यानंतर सुरक्षित स्पर्श म्हणजे काळजी, प्रेम, आणि आधार दर्शवणारा स्पर्श; तर असुरक्षित स्पर्श म्हणजे मुलाला अस्वस्थ करणारा, भीती वाटायला लावणारा किंवा गुप्त ठेवण्यास सांगितला जाणारा स्पर्श कसा असतो, हे सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले.

असुरक्षित स्पर्श झाल्यास त्वरित ‘नो’, ‘गो’, ‘टेल’ ही तीन पावलं उचलावीत – आवाज उठवणे, त्या ठिकाणापासून दूर जाणे आणि विश्वासू व्यक्तीला किंवा पालकांना याची माहिती देणे – हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे स्पष्टीकरण एका छोटेखानी नाट्यप्रयोगातून करण्यात आले. त्यामुळे मुलांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेत संकल्पना सहज समजून घेतली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी संबंधित पोलिस स्टेशनचा क्रमांक पाठ करून घेण्यात आला. आपत्कालीन मदत कशी मागवावी, अडचणीत सापडल्यास कोणत्या व्यक्तीकडे धाव घ्यावी आणि पोलिसांकडून मिळणाऱ्या सहाय्याविषयी माहिती देण्यात आली.

या उपक्रमाचे मार्गदर्शन आरती जाधव यांनी केले. त्यांनी अतिशय सोप्या, संवेदनशील आणि मुलांना समजेल अशा पद्धतीने महत्वाचे मुद्दे मांडले. मुलांसोबतच शिक्षक आणि पालकांनाही मुलांच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षणाविषयी जागरूकता वाढवणारा ठरला. लहान वयातच मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते धोकादायक परिस्थितीत स्वतःचे रक्षण करू शकतात, यावर सर्वांचे एकवाक्याने मत होते.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!