Homeमहत्त्वाचेदेहूरोड बुद्ध विहार वर्धापन दिनानिमित्त वाहतुकीत मोठे बदल; जुना मुंबई–पुणे महामार्ग दिवसभर...

देहूरोड बुद्ध विहार वर्धापन दिनानिमित्त वाहतुकीत मोठे बदल; जुना मुंबई–पुणे महामार्ग दिवसभर बंद

देहूरोड बुद्ध विहार वर्धापन दिनानिमित्त वाहतुकीत मोठे बदल; जुना मुंबई–पुणे महामार्ग दिवसभर बंद

देहूरोड : देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्ध विहाराच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर भाविक व अनुयायी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने देहूरोड परिसरात वाहतूक नियंत्रणाबाबत विशेष अधिसूचना जारी केली आहे. भाविकांची सुरक्षितता तसेच वाहतुकीचा सुरळीत प्रवाह राखण्यासाठी सकाळी ४.०० वाजल्यापासून मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत तात्पुरते वाहतूक बदल लागू राहणार आहेत.

या अधिसूचनेनुसार २५ डिसेंबर रोजी जुना मुंबई–पुणे महामार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सेंट्रल चौक, देहूरोड ते भक्ती शक्ती चौक या मार्गावर मुंबईकडे तसेच पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सेंट्रल चौकातून येणाऱ्या वाहनचालकांनी उजवीकडे वळून बेंगलोर हायवेने मुकाई चौक मार्गे आपल्या इच्छित स्थळी जावे. तर भक्ती शक्ती सर्कलच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी दोन पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहनचालकांनी डावीकडे वळून अप्पू घर कॉर्नर, बिग इंडिया चौक, धर्मराज चौक, हँगिंग ब्रिज मार्गे प्रवास करावा. अथवा डावीकडे वळून अप्पू घर कॉर्नर येथून नवीन पुलावरून मुकाई चौक मार्गे पुढील प्रवास करावा, असे नियोजन करण्यात आले आहे.

हे सर्व वाहतूक निर्बंध अत्यावश्यक सेवेतील वाहने – जसे की रुग्णवाहिका, अग्निशमन दल व पोलीस वाहने – यांना लागू राहणार नाहीत. मात्र इतर सर्व वाहनचालकांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, भाविकांना वेळेचे नियोजन करून प्रवास करण्याचे तसेच स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उप-आयुक्त (वाहतूक शाखा) विवेक पाटील यांनी केले आहे. बुद्ध विहाराच्या वर्धापन दिनाचा सोहळा शांततेत व सुरक्षिततेत पार पडावा, यासाठी ही वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!