
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते : प्रा. वैशाली सिलनकर
वडगाव मावळ दि.12 (प्रतिनिधी) राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते. राष्ट्रीय सेवा योजना युवकांना घडविण्याचे कार्य करते. स्वयंसेवकांना आत्मविश्वास, श्रमसंस्कार, स्वयंशिस्त, राष्ट्रप्रेम, संकटांचा सामना करणे आदी शिकविले जाते. असे प्रतिपादन प्रा. वैशाली सिनलकर यांनी केले.


श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ कला वाणिज्य व बीबीए महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या भोयरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी (दि.3) ते शुक्रवारी (दि.9) आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात त्या बोलत होत्या.
“प्रा.सिनलकर पुढे म्हणाल्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळविण्याचा मार्ग दाखवते. राष्ट्रीय सेवा योजनेचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत.”


शनिवार (दि.3) शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, प्राचार्य अशोक गायकवाड यांचे युवाशक्ती या विषयावर प्रमुख व्याख्यान झाले.
रविवार (दि.4) ॲड किशोर ढोरे यांचे पडीक जमिनीचा विकास व ग्रामीण विकास या विषयावर व्याख्यान झाले.
सोमवार (दि.5)ॲड जुही किशोर ढोरे यांचे महिला विषयक कायदे या विषयावर व्याख्यान झाले.
मंगळवार (दि.6) प्रा. संपत गारगोट यांचे युवकांपुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान झाले.
बुधवार (दि.7) प्रा. मुकुंद तनपुरे यांचे स्वच्छ समर्थ भारत या विषयावर व्याख्यान झाले.
गुरुवार (दि.8) प्रा.वैशाली सिनलकर यांचे राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान झाले.
शुक्रवार (दि.9) मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप तसेच डॉ. शीतल दुर्गाडे यांचे महिला सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली.


शिबिर काळात बालविवाह, पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन व लोकसंख्या नियंत्रण आदी विषयी जनजागृती तसेच महापुरुषांच्या विचाराचा जागर, माती पाणी परीक्षण, ग्राम आरोग्य सुधारणा, योगाचे महत्त्व आदी विषयी उपक्रम राबविले.
गावातील सरपंच वर्षा अमोल भोईरकर, सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरख भोईरकर, प्राचार्य जिनत पठाण, मुख्याध्यापक विजयकुमार चिले, सामाजिक कार्यकर्ते विजय नाना शिंदे, राजाराम करवंदे आदींनी विशेष सहकार्य केले.
विद्यार्थ्यांना दीड तास चालत जाऊन श्री तासुबाई देवी मंदिरा परिसर स्वच्छ केला. तसेच शाळा परिसर तसेच रस्ते स्वच्छ करून कृतीतून स्वच्छतेचे संदेश दिले.

शिबिर काळात संस्थेचे संस्थापक माजी मंत्री मदन बाफना, संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना, संचालक तुकाराम कडलक, रामभाऊ देशमुख, प्रल्हाद जांभुळकर प्राचार्य अशोक गायकवाड, प्रा. महादेव वाघमारे, डॉ. शीतल दुर्गाडे, डॉ. शीतल शिंदे, प्रा. रोहिणी चंदनशिवे, प्रा. योगेश जाधव, डॉ. जया धावारे, प्रा. प्रणिता सूर्यवंशी, प्रा. सुरेखा केंगले, प्रा.प्रियांका पाटील, प्रा. मोहिनी ठाकर, प्रा. सोनिका ओव्हाळ, प्रा. सुप्रिया पाटोळे व मंगल हिंगे, आदींची विशेष उपस्थिती व सहकार्य लाभले.
शिबिर काळात योग्य नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.महादेव वाघमारे व प्राध्यापकांनी केले.



















