Homeशिक्षण-प्रशिक्षणसी आर पी एफ जवानांसोबत विद्यार्थ्यांचे वंदे मातरम सकलगायन. तळेगावमध्ये देशभक्तीचा जागर

सी आर पी एफ जवानांसोबत विद्यार्थ्यांचे वंदे मातरम सकलगायन. तळेगावमध्ये देशभक्तीचा जागर

सी आर पी एफ जवानांसोबत विद्यार्थ्यांचे वंदे मातरम सकलगायन. तळेगावमध्ये देशभक्तीचा जागर

तळेगाव दाभाडे : तळेगाव रेल्वे स्टेशन परिसरातील लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्रमांक ३ (स्थापना १९१८) येथे मंगळवारी (२० जून) देशभक्तीचा उत्स्फूर्त जागर अनुभवायला मिळाला. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) २४२ बटालियनच्या अधिकारी व जवानांसोबत शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचे सकल गायन करत राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ केली. या उपक्रमामुळे शाळेचा परिसर देशभक्तीच्या सुरांनी दुमदुमून गेला.

सीआरपीएफच्या २४२ बटालियनच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उप-कमांडंट कृष्ण कुमार झा उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ निरीक्षक जे. पी. सिंग, एम. सलीम, इनवल सिंग, के. के. पांडेय यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या कुलकर्णी, प्रा. ए. ए. खान तसेच शिक्षकवृंद व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम’च्या सामूहिक गायनाने झाली. जवान व विद्यार्थी एकत्र उभे राहून जेव्हा राष्ट्रगीत सादर करत होते, तेव्हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि प्रेरणेचा भाव स्पष्ट दिसत होता. या क्षणाने विद्यार्थ्यांना देशसेवेचे मोल प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली.

उप-कमांडंट कृष्ण कुमार झा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षक हे देशाचे खरे भाग्यविधाते आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून राष्ट्राच्या भवितव्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. ‘वंदे मातरम’ या गीताचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व भावनिक अर्थ उलगडून सांगताना त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात या गीताने दिलेल्या प्रेरणेचा आढावा घेतला. राष्ट्रप्रेम केवळ शब्दांत न राहता आचरणात उतरवावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करण्याचा संदेश त्यांनी दिला.

मुख्याध्यापिका संध्या कुलकर्णी यांनी स्वागतपर प्रास्ताविकात सीआरपीएफच्या जवानांचे शाळेत आगमन हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या जवानांकडून विद्यार्थ्यांनी धैर्य, शिस्त आणि देशभक्तीचे धडे घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची बीजे रोवली जातात, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या शबनम खान, शिक्षक कमल पाटील, सुरेखा घरदाळे, अविनाश खुणे, जयश्री उंडे, प्रिती पारेकर, अनिता शिंदे, मिलिंद डमरे, कविता खराडे, रूपेश काटकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिका जयश्री उंडे यांनी आभार मानले.

सीआरपीएफ २४२ बटालियनच्या या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक बळकट झाली असून, समाज व सुरक्षा दल यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!