Homeराजकीयमहायुतीचे उमेदवार जाहीर; मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गटनिहाय...

महायुतीचे उमेदवार जाहीर; मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गटनिहाय चेहरे निश्चित

महायुतीचे उमेदवार जाहीर; मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गटनिहाय चेहरे निश्चित

मावळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेना (शिंदे गट) महायुतीने आपले उमेदवार अधिकृतपणे जाहीर केले आहेत. तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटांसह पंचायत समितीच्या दहा गणांसाठी अनुभवी, स्थानिक पातळीवर कार्यरत व जनतेशी थेट संपर्क असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याने महायुतीने विकासकेंद्री लढतीचा निर्धार व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार महायुतीने जिल्हा परिषदेसाठी सर्व गटांमध्ये ताकदीचे उमेदवार उतरवले आहेत.

टाकवे बु. – नाणे गटातून मधुकर लहू कोकाटे, वराळे – इंदोरी गटातून मेघा प्रशांत भागवत, खडकाळा – कार्ला गटातून आशा बाबुराव वायकर, कुसगाव – काले गटातून दत्तात्रय शंकर गुंड तर सोमाटणे – चांदखेड गटातून शितल अविनाश गराडे यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे.

पंचायत समिती गणनिहाय उमेदवार पंचायत समितीच्या दहा गणांसाठी भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात समन्वय साधत उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.

टाकवे बु. गणातून अश्विनी सोमनाथ कोंडे (शिवसेना), नाणे गणातून संगीता ज्ञानेश्वर आधारी, वराळे गणातून रवींद्र निवृत्ती शेटे, इंदोरी गणातून श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे, कार्ला गणातून रंजना सुरेश गायकवाड, खडकाळा गणातून प्रकाश बाबुराव गायकवाड, कूसगांव गणातून नवनाथ पांडुरंग हारपूडे, काले गणातून सीमाताई मुकुंद ठाकर, सोमाटणे गणातून बाळासाहेब नथू पारखी व चांदखेडे गणातून सुवर्णा घोटकुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी उमेदवार जाहीर करताना आयोजित पत्रकार परिषदेस भाजपाचे निवडणूक प्रमुख बाळासाहेब नेवाळे, कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्ती शेटे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजू खांडभोर, भाजपाचे ज्येष्ठ नेते अविनाश बवरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, शरद हुलावळे, कामशेत–खडकाळा मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासाचा अजेंडा पुढे महायुतीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत महिला, अनुभवी नेतृत्व व नव्या चेहऱ्यांचा समतोल राखण्यात आला आहे. ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण व शेतीपूरक सुविधा या मुद्द्यांवर भर देत निवडणूक लढवली जाणार असल्याचे यावेळी नेत्यांनी सांगितले. उमेदवार जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून महायुतीच्या प्रचाराला वेग आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!