मावळ मधील वडिवळे धरणात मे महिन्याच्या अखेरीस ४० टक्के पाणीसाठा
कामशेत : नाणे मावळ मधील वडिवळे धरणातील पाणीसाठा मे महिन्या अखेरीस सुमारे ४० टक्के शिल्लक आहे. कुंडलिका नदीच्या व परिसरातील दऱ्याखोऱ्यातील जल स्तोत्रावर धरणातील पाणीपातळी वर्षभर टिकून राहते.२२ ऑक्टोबर १९७८ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते तर पाटबंधारे खात्याचे मंत्री गोविंदराव अदिक यांच्या अध्यक्षतेखाली याचा शुभारंभ झाला होता.
सद्यस्थितीत धरणाची मजबुती कायम असून साधारणपणे ४ अधिकारी आणि १० कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत अशी माहिती शाखा अभियंता संतोष शिंदे व लेवल मास्टर सुरेश शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्यासह भारत साबळे, भाऊ जांभुळकर, भरत सावळे, बापू कांबळे, शंकर भोंडवे, गुलाब शिंदे, अनंता थरकुडे, गुलाब खेंगळे, मारुती जाधव व गबळू कोंढरे हे कर्मचारी धरणाच्या देखभालीचे काम पाहत आहेत.
सद्यस्थितीत वडिवळे धरणाची पाणी पातळी.६२८.१०. एकूण साठा – २३.८७. उपयुक्त साठा – १३.३९. टक्केवारी- ४४. एकूण पाऊस- ३७८५.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















