Homeमहत्त्वाचेदोन डिसेंबरला जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी; नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

दोन डिसेंबरला जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी; नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

दोन डिसेंबरला जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी;

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

पुणे : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी पात्र मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय मतदान करता यावे, यासाठी २ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखत मतदारांचा सहभाग वाढावा, हा सुट्टी जाहीर करण्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी–उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये मतदान होणार असून, संबंधित क्षेत्रांमध्ये निवडणूक दिनी पूर्ण सार्वजनिक सुट्टी लागू असेल.

विशेष म्हणजे, मतदारसंघाच्या क्षेत्रातील कामानिमित्त बाहेर असणाऱ्या मतदारांनाही ही सुट्टी लागू राहणार आहे. यामुळे बाहेरगावी नोकरी किंवा काम करणाऱ्या मतदारांना आपापल्या क्षेत्रात परत येऊन मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. केंद्र सरकारची शासकीय कार्यालये, निमशासकीय संस्था, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि अन्य कार्यालयांना देखील ही सुट्टी लागू राहील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मतदान हा लोकशाहीतील मूलाधार असल्याने सर्व पात्र मतदारांनी मतदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जितेंद्र डुडी यांनी केले. मतदारांनी २ डिसेंबर रोजी आपापल्या केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सुविधा आणि सुरक्षिततेची सर्व तयारी पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!