भाजे येथील संपर्क बालग्राम संस्थेच्या १३० मुलांना बावर इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने शालेय स्कूल बॅग व शालेय गणवेश वाटप
लोणावळा : मावळ तालुक्यातील भाजे येथे असणारी संपर्क बालग्राम संस्थेच्या १३० मुलांना शालेय स्कूल बॅग व गणवेश वाटप करण्यात आले. मंगळवार दिनांक १० जुन २०२५ रोजी मेट्रो प्रोजेक्टसाठी लागणारे इक्विपमेंट बनवणारी आघाडीची कंपनी म्हणून देशभर नावलौकिक असलेल्या बावर इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने संपर्क बालग्राम संस्थेमधील १३० मुलांना शालेय स्कूल बॅग व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी कंपनीचे मॅनेजमेंट डायरेक्टर अनिमेश नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपर्क बालग्राम संस्थेत राबविण्यात आला. यावेळी बोलताना कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद भुवड म्हणाले की स्वतःच्या व समाजाच्या विकासासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. समाजातील निराधार मुलांना आपण सेवाभावी वृत्तीने देत असलेले शिक्षण कार्य फार मोलाचे आहे.
या कार्याला हातभार लावण्याची आम्हाला संधी मिळाली संस्थेचा परिसर व स्वच्छता वाखण्याजोगी आहे. भविष्यात देखील या संस्थेला व मुलांना मदत केली जाईल असे मिलिंद भुवड यांनी सांगितले. संपर्क बालग्राम चे वरिष्ठ सल्लागार नवनिता चटर्जी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. यावेळी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद भुवड, मनुष्यबळ विभाग प्रमुख सुहासिनी दास, मनुष्यबळ विभाग उपव्यवस्थापक विपुल घाटी, कंपनी व्यवस्थापक अर्पणलाल सिंधा, लेखापाल अक्षय अहिरे, संपर्क बालग्राम चे वरिष्ठ सल्लागार नवनिता चटर्जी, प्रशासकीय अधिकारी योगेंद्र कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी प्रदीप वाडेकर, संपर्क बालग्राम चे अधीक्षक सुभाष बोगाडे, साप्ताहिक अंबर वृत्तपत्राचे सहसंपादक प्रशांत पुराणिक, बालग्राम संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















