Homeराजकीयमावळचा सुपुत्र जिंकला मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक ४ मधुन मंगेश पांगारे नगरसेवक पदी

मावळचा सुपुत्र जिंकला मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक ४ मधुन मंगेश पांगारे नगरसेवक पदी

मावळचा सुपुत्र जिंकला मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक ४ मधुन मंगेश पांगारे नगरसेवक पदी

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना मुंबई महानगरपालिकेचा कौल सर्वाधिक चर्चेचा ठरला. मुंबईचा निकाल म्हणजे राज्याच्या राजकारणाची दिशा ठरविणारा मानला जातो. अशा या महत्त्वाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मंगेश पांगारे यांनी दणदणीत विजय मिळवत नगरसेवकपद पटकावले. या विजयामुळे मावळ तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

मंगेश पांगारे हे मुळचे मावळ तालुक्यातील आंदर मावळ विभागातील पारिठेवाडी गावचे सुपुत्र आहेत. सामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी मुंबईत मेहनतीच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले. सामाजिक कार्य, संघटन आणि जनसंपर्क याच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट नाळ जोडली. निवडणूक प्रचारादरम्यान झोपडपट्ट्या, वसाहती, कष्टकरी वस्त्या तसेच मध्यमवर्गीय मतदारांपर्यंत त्यांनी सातत्याने संवाद साधला.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच पांगारे यांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत मतांची आघाडी वाढवत त्यांनी विरोधकांवर निर्णायक मात केली. विजयाची घोषणा होताच प्रभागात शिवसैनिकांनी जल्लोष केला. फटाके, गुलाल आणि घोषणा यांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या विजयाची दखल मावळ तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे. पारिठेवाडी गावासह संपूर्ण मावळमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मावळचा युवक थेट मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पोहोचल्याने गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना दिसून येत आहे.

विशेष म्हणजे मुंबईतील डबेवाल्यांच्या वतीने मुंबई महानगरपालिकेत प्रथमच नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करण्याचा मान मंगेश पांगारे यांना मिळाला आहे. कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न थेट पालिकेच्या सभागृहात मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिवसेना–भाजपा युतीचे नगरसेवक म्हणून ते सत्ताधारी बाकावर विराजमान होणार आहेत.

हा विजय केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून, ग्रामीण भागातून आलेल्या नेतृत्वाच्या ताकदीचे प्रतीक मानला जात आहे. मुंबईच्या राजकारणात मावळचा ठसा उमटला असून, विकासकामे, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार मंगेश पांगारे यांनी व्यक्त केला आहे. मावळचा सुपुत्र नगरसेवक झाल्याने मावळच्या जनतेचा मान उंचावला आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!