Homeमहत्त्वाचेमावळमध्ये अवकाळी पाऊसामुळे शेतीचे मोठे नुकसान

मावळमध्ये अवकाळी पाऊसामुळे शेतीचे मोठे नुकसान

मावळमध्ये अवकाळी पाऊसामुळे शेतीचे मोठे नुकसान

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात मागील चार दिवसापासून अवकाळी पाऊस पडत असल्याने उन्हाळी बाजरी पिक धोक्यात आले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पाऊसामुळे काढणीस आलेले तयार बाजरीचे पीक व मका तसेच फरसबी शेतात आडवे झाले आहेत. यामुळे मावळ मधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाले सोबत अन्य शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मावळ तालुक्यात उन्हाळ्यात पाण्याची सोय असलेले शेतकरी बाजरीचे आणि भुईमुगाचे तसेच बागायती भाजीपाल्याचे पिके घेतात. साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात बाजरी. भुईमूग पिकांची पेरणी होते. सध्या बाजरी काढण्याचा काळ असून शेतकरी पिक काढण्याची तयारी करत होते मात्र अचानक झालेल्या अवकाळी पाऊसाने शेतातील उभ्या पिकाला पाऊसाचा चांगलाच फटका बसला आहे.

पिके शेतातच आडवे झाले असून तयार बाजरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊसाचा जोर सतत वाढत राहिल्याने शेतीचे नुकसान होते. त्याचा पंचनामा करावा अशी मागणी महिला शेतकरी  सुनंदा खांडभोर यांनी केली आहे. याविषयी बोलताना महिला शेतकरी  सुनंदा खांडभोर म्हणाल्या की सध्या बाजरी काढणीला आली होती. अवकाळी पाऊस पडल्याने बाजरी काढता आली नाही. परिणामी मोठे नुकसान झाले. तर दुसरीकडे भात लावणी पूर्वी भाजणी करणे. रोप टाकायला दाढ करणे. कुळवणी. नांगरणी अशी ही कामे खोळंबली आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!