Homeराजकीयवडगाव नगरपंचायत निवडणूक : भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर

वडगाव नगरपंचायत निवडणूक : भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर

वडगाव नगरपंचायत निवडणूक : भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर

वडगाव मावळ │ वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी पहिली अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली. निवडणूक प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी ही यादी जाहीर करताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर पाहायला मिळाली.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, भाजपचे ज्येष्ठ नेते अविनाश बवरे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर भोसले, सुभाषराव जाधव, तुकाराम काटे, नारायण ढोरे, विजय जाधव, बंडोपंत भेगडे, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कार्यक्रमात महत्त्वाचा क्षण म्हणजे मावळ तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष विशाल वहीले आणि माजी उपनगराध्यक्ष पूजा वहीले यांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून भाजपला मोठी शक्ती दिली. त्यांच्या प्रवेशामुळे मावळ तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी

  • मृणाल गुलाबराव म्हाळसकर – नगराध्यक्ष

नगरसेवक पदासाठी जाहीर झालेले उमेदवार (पहिली यादी)

वार्ड क्रमांक उमेदवाराचे नाव
वार्ड १ रेणुका कोकाटे
वार्ड २ दिनेश ढोरे
वार्ड ३ रोहित धडवले
वार्ड ४ पूजा ढोरे
वार्ड ५ अश्विनी म्हाळसकर
वार्ड ६ शेखर वहीले
वार्ड ७ दीपक भालेराव
वार्ड १० सुजाता भेगडे
वार्ड ११ किरण म्हाळसकर
वार्ड १२ राजू (हं.) म्हाळसकर
वार्ड १४ दिपाली मोरे
वार्ड १५ अनंता कुडे
वार्ड १६ राणी म्हाळसकर
वार्ड १७ अर्चना म्हाळसकर

भाजपच्या शक्तिप्रदर्शनाने निवडणुकीची रंगत वाढली

यादी जाहीर होताच वडगाव शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक वार्डांमध्ये भाजपने नव्या चेहऱ्यांसोबत अनुभवी नेतृत्वालाही संधी दिल्याने पक्षाची निवडणूक रणनीती मजबूत करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

भाजपच्या या पहिल्या यादीमुळे वडगाव नगरपंचायत निवडणुकीची लढत आणखी उत्सुकतेची बनली असून लवकरच दुसरी यादीही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!