Homeराजकीयवडगाव नगरपंचायतीचा पदग्रहण सोहळा उत्साहात; आमदार सुनील शेळकेंचे विकासासाठी ठोस मार्गदर्शन

वडगाव नगरपंचायतीचा पदग्रहण सोहळा उत्साहात; आमदार सुनील शेळकेंचे विकासासाठी ठोस मार्गदर्शन

वडगाव नगरपंचायतीचा पदग्रहण सोहळा उत्साहात; आमदार सुनील शेळकेंचे विकासासाठी ठोस मार्गदर्शन

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे तसेच सर्व प्रभागांतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला राजकीय, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, मुख्याधिकारी प्रवीण निकम, गणेशआप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, बाळासाहेब ढोरे, गुलाबराव म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे, मयूर ढोरे, मृणाल म्हाळसकर, प्रवीण ढोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पदग्रहणानंतर मार्गदर्शन करताना आमदार सुनील शेळके यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांना शहराचा कारभार अत्यंत स्वच्छ, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चालवण्याच्या सूचना दिल्या. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वडगाव शहरातील पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत वडगाव नगरपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करून शहराचा लौकिक राज्यपातळीवर वाढवावा, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी आमदार शेळके म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वतः नगरपंचायतीच्या सोबत राहून सातत्याने पाठपुरावा करू. वडगावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दरम्यान, याच कार्यक्रमात पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. शहराच्या विकासात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली.

एकूणच हा पदग्रहण समारंभ वडगाव शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला असून, नागरिकांमध्ये नव्या अपेक्षा आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!