Homeराजकीयआपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत- आमदार सुनील शेळके

आपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत- आमदार सुनील शेळके

आपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत- आमदार सुनील शेळके

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जनता दरबारात उपस्थित

वडगाव मावळ ५ मे – “जनतेशी थेट संवाद आणि त्यांच्या अडचणींचे त्वरित निराकरण हेच खरे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी करत, त्यांचा जनता दरबार उपक्रम पुन्हा एकदा नागरिकांच्या भरघोस उपस्थितीमुळे यशस्वी ठरला.

वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात आमदार शेळके यांनी विविध समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे सविस्तर ऐकून घेतले. मागील साडेपाच वर्षांप्रमाणे दर सोमवारी होणाऱ्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रलंबित शासकीय कामे, शैक्षणिक व आरोग्य विषयक अडचणी, योजनांचा लाभ, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा यासंबंधी अनेक तक्रारी व सूचना नागरिकांनी मांडल्या.

दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दीपाली गराडे, दीपक हुलावळे, साहेबराव कारके, काळूराम मालपोटे, पंढरीनाथ ढोरे, नारायण ठाकर, नारायण भालेराव, भरत येवले, सुहास गरुड, चंद्रकांत दाभाडे आणि किशोर सातकर हे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेत कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला.

यावेळी बोलताना आमदार शेळके म्हणाले, “आपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत. त्या ऐकून घेऊन तत्काळ निर्णय घेणे आणि प्रशासनाला कामासाठी भाग पाडणे, हीच खरी जबाबदारी आहे. जनता दरबार उपक्रमातून लोकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते, त्यातूनच परिवर्तनाची दिशा ठरते.”

वडगाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्यामुळे जनता दरबाराला पुन्हा एकदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार शेळके यांच्या कार्यपद्धतीमुळे मावळ तालुक्यात लोकांमध्ये विश्वास व समाधान व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!