Homeराजकीयतळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची पहिली उमेदवारी यादी जाहीर

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची पहिली उमेदवारी यादी जाहीर

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची पहिली उमेदवारी यादी जाहीर

तळेगाव दाभाडे : येऊ घातलेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी राजकीय वातावरणाला उष्णता येऊ लागली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज (१२ नोव्हेंबर) तळेगाव दाभाडे येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पहिल्या उमेदवारी यादीची घोषणा केली. या यादीत एकूण नऊ प्रभागांसाठी अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, उर्वरित उमेदवारांची नावे पुढील दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, शहर प्रभारी व माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेत आमदार शेळके यांनी सांगितले की, “तळेगाव दाभाडे शहरात विकासाचे काम सतत गतीमान ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पक्षाने सक्षम व लोकाभिमुख उमेदवारांची निवड केली आहे.”

घोषित उमेदवारांची पहिली यादी खालीलप्रमाणे :

प्रभाग 1 – सौआशा अशोक भेगडे

प्रभाग 2 – संदीप बाळासाहेब शेळके.

प्रभाग 3 – सिद्धार्थ गोरख दाभाडे.

प्रभाग 4 – गणेश मोहनराव काकडे.

प्रभाग 5 – सौ भारती सुरेश धोत्रे.

प्रभाग 7 – सत्यम गणेश खांडगे.

प्रभाग 9 – सौ हेमलता चंद्रभान खळदे.

प्रभाग 10 – श्रीमती संगिता सतिश खळदे.

प्रभाग 12 – संतोष छबुराव भेगडे.

या यादीत अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांचा समावेश असल्याने पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. उमेदवारांच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत उमेदवारांचे अभिनंदन केले. शहरातील विविध ठिकाणी समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

पहिल्या यादीमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीची राजकीय सरगर्मी चांगलीच वाढली असून, उर्वरित प्रभागातील उमेदवारी यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीतील ही यादी जाहीर झाल्यामुळे इतर पक्षांच्या तयारीलाही वेग आला आहे. येत्या काही दिवसांत तळेगावच्या राजकारणात नव्या समीकरणांना वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!