सुदुंबरे ते निगडी या बस सेवेच्या वर्षपूर्ती निमित्ताने सरपंच मंगल गाडे यांचे सुदुंबरे ग्रामस्थांनी मानले आभार
सुदुंबरे ते निगडी दरम्यान पीएमपीएमएल बस सेवा सुरू होऊन एक वर्ष झाले. वर्षभरात सुमारे दीड लाख प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घेतला. गावातून पिंपरी चिंचवड शहराकडे जाणारे कामगार, विद्यार्थी तसेच सुदुंबरे येथे विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थी तसेच भाविकांसाठी ही बस सेवा फायदेशीर ठरली आहे. बस सेवेच्या वर्षपूर्ती निमित्त सुदुंबरे येथे कार्यक्रम घेण्यात आला. गावच्या सरपंच मंगल कालीदास गाडे यांच्या प्रयत्नातून ही बस सेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुदुंबरे गावच्या सरपंच मंगल कालिदास गाडे ह्या होत्या. यावेळी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान विश्वस्त शांताराम कराळे (पाटील), माजी उपसरपंच सुरेश गाडे,जालिंदर गाडे, बापू बोरकर, कालीदास गाडे, ग्रामपंचायत सदस्य सविता गाडे,अलका गाडे,संगीता गाडे,विजय गुंजाळ,संतोष कांबळे आदी उपस्थित होते.
गावचा सरपंच म्हणजे खऱ्या अर्थाने गावचा सेवक या न्यायाने सुदूंबरे गावातील सरपंच मंगल कालिदास गाडे यांनी गावातल्या मूलभूत सुविधा देण्याकडे लक्ष केंद्रित केले त्यामधून त्यांनी सुदूंबरे ते पिंपरी चिंचवड अशी बस सेवा सुरू व्हावी म्हणून अथक परिश्रम करून त्यांनी बस सेवा सुरू केली आणि आज ह्या बस सेवेला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
सिद्धांत कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी, कॉलेजचा स्टाफ आणि सुदुंबरे गावातील सर्वसामान्य नागरिक,महिला,पुरुष, शेतकरी आणि एमआयडीसीतील कामगार आशा सर्वांना या सेवेचा लाभ घेता आला आणि खऱ्या अर्थाने लोकनियुक्त सरपंच कसा असतो हे त्यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिले. असे मत श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थांन विश्वस्त आणि कामगार नेते शांताराम कराळे (पाटील) यांनी व्यक्त केले.
तसेच सिद्धांत इंजीनियरिंग कॉलेजच्या प्राचार्या नंदा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान कमी झाल्यामुळे आणि सर्वात जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आणि बस सेवेला धन्यवाद दिले.
सरपंच गाडे यांनी एक वर्षभरात एक ते दीड लाख प्रवाशांनी या सेवेचा फायदा घेतला. आणि पुढील दहा कोटीच्या कामाचा लोकार्पण सोहळा लवकरच आपण करणार आहोत आणि आठ कोटीच्या कामाचे भूमिपूजन करणार आहोत असे सरपंच मंगल गाडे यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे.तसेच प्रवाशांना पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
माजी उपसरपंच सुरेश नाना गाडे, जालिंदर गाडे आणि बापू बोरकर यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केले. नवनाथ गाडे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले आणि आभार दत्तात्रय गाडे यांनी मांनले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















