Homeराजकीयतळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी येणाऱ्या निवडणुकांसाठी १४ प्रभाग व २८ नगरसेवकांची...

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी येणाऱ्या निवडणुकांसाठी १४ प्रभाग व २८ नगरसेवकांची संरचना निश्चित राजकीय चित्र बदलण्याचे संकेत

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी येणाऱ्या निवडणुकांसाठी १४ प्रभाग व २८ नगरसेवकांची संरचना निश्चित राजकीय चित्र बदलण्याचे संकेत

तळेगाव दाभाडे : नगर विकास विभागाने २०११ च्या जनगणनेच्या आधारे प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने आगामी येणाऱ्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी नवीन रचनेनुसार एकूण १४ प्रभाग निश्चित करण्यात आले असून प्रत्येकी २ नगरसेवक अशा एकूण २८ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे.

या रचनेमुळे अखेर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ओबीसी समाजाला २०२२ पूर्वी लागू असलेले आरक्षण यावेळी देखील कायम राहणार असून सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे सुमारे तीन वर्षापासून प्रशासकीय राजवटी खाली असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रतीक्षा आता संपली आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले की शासनाच्या सूचनेनुसार दोन सदस्य प्रभाग रचनेचा अहवाल तयार केला असून तो लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल.

आगामी निवडणुकीत तळेगावचे राजकीय चित्र बदलणार असल्याचे अनेक जाणकारांनी सांगितले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १४ नगरसेवक. तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ६ नगरसेवक तर जनसेवा विकास समितीचे ६ नगरसेवक निवडून आले होते. तीनही गटात प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक होता. भारतीय जनता पक्षाच्या चित्रा जगनाडे नगराध्यक्ष म्हणून जनतेमधून निवडून आल्या होत्या.

त्यानंतरच्या घडामोडी मध्ये भाजपाकडे १२ नगरसेवक तर तळेगाव शहर विकास समितीकडे ७ नगरसेवक तर जनसेवा विकास समितीकडे ७ नगरसेवक होते त्यानंतर नगरपरिषदेत प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. प्रशासकीय राजवटीच्या काळात अनेक विकास कामे रखडली आहेत.

त्यामुळे नव्या लोकप्रतिनिधींची निवड झाल्यानंतर शहराच्या विविध विकास योजनांना गती मिळेल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे अनेक इच्छुक नगरसेवकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीमध्ये आमदार सुनील शेळके हेच किंग मेकर ठरणार आहे असे देखील अनेक नागरिक सांगत आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!