Homeराजकीयआज ठरणार तळेगाव व लोणावळा नगराध्यक्ष पदाचे आरक्षण

आज ठरणार तळेगाव व लोणावळा नगराध्यक्ष पदाचे आरक्षण

आज ठरणार तळेगाव व लोणावळा नगराध्यक्ष पदाचे आरक्षण

२४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण सोडत मंत्रालयात

तळेगाव दाभाडे : बराच काळ प्रलंबित असलेल्या तळेगाव आणि लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत अखेर निश्चित झाली आहे. आज सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद कार्यालयात ही सोडत काढण्यात येणार असून, महाराष्ट्र नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी यासंबंधी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

Oplus_16908288

या सोडतीत राज्यातील एकूण २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे आणि लोणावळा या दोन्ही नगरपरिषदांची मुदत २०२१ साली संपली असून, तेव्हापासूनच दोन्ही शहरांतील इच्छुक उमेदवार, माजी पदाधिकारी आणि नागरिक आगामी निवडणुकीकडे डोळे लावून बसले आहेत.

राजकीय वर्तुळात बोलल्या जाणाऱ्या चर्चेनुसार, दोन्ही नगरपरिषदांतील नगराध्यक्ष पद खुले राहो वा आरक्षित, प्रमुख लढत विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्या गटांमध्येच रंगण्याची शक्यता आहे. पुढील उमेदवारी निश्चित करताना विधानसभा निवडणुकीतील घडामोडी, पक्षीय समीकरणे, तसेच संकटकाळात कोणाच्या पाठीशी कोण उभे राहिले यावर मोठा परिणाम होणार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

Oplus_16908288

आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मावळ तालुक्यातील दोन्ही शहरांतील राजकीय समीकरणांना नव्या कलाटणीचा ताण मिळेल. त्यामुळे येत्या काही दिवसांतच स्थानिक राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोणावळा नगराध्यक्ष पदासाठी गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. अनेक संभाव्य उमेदवारांनी उघडपणे जनसंपर्क मोहिमा राबवत, नागरिकांच्या समस्या जाणून घेत आणि सण-उत्सवांतून संवाद वाढवत आपली राजकीय छाप पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर काही इच्छुकांनी अद्याप आपली भूमिका गुप्त ठेवत ‘योग्य वेळेची प्रतीक्षा’ करण्याची रणनीती अवलंबली आहे.

तळेगाव नगरपरिषदेबाबतही अशीच उत्कंठा असून, नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित ठरणार याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रीत झाले आहे.

राज्यभरातील या सोडतीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांतील इच्छुक, पदाधिकारी आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, निकाल जाहीर झाल्यानंतर मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार हे निश्चित मानले जात आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे | मो. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!