
परीक्षेच्या रणधुमाळीत अतुलभाऊंचा आधार; विद्यार्थ्यांसाठी तातडीने बसची व्यवस्था
वराळे (मावळ) : परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी केवळ प्रश्नपत्रिका नसून, ती त्यांच्या भवितव्याची कसोटी असते. अशा निर्णायक क्षणी जर व्यवस्था कोलमडली, तर विद्यार्थ्यांचे आयुष्य अडचणीत येऊ शकते. मात्र वराळे गणात हीच कसोटी समाजहिताच्या जाणिवेने पार पडली. युवा नेतृत्व अतुलभाऊ काळुराम मराठे यांनी वेळेवर पुढाकार घेत परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तातडीने बसची व्यवस्था करून दिली आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहे हे सिद्ध करून दाखवले.


दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी श्री भैरवनाथ विद्या मंदिर, वराळे येथील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहनांची अचानक टंचाई भासली. ठरलेल्या वेळेत वाहन न मिळाल्यास विद्यार्थ्यांची परीक्षा हुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. पालकांमध्ये चिंता, विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. परीक्षेच्या दिवशी अशी अवस्था म्हणजे प्रशासनिक अपयशाचे जिवंत उदाहरण ठरले असते.


ही गंभीर बाब समजताच अतुलभाऊ मराठे यांनी क्षणाचाही विलंब न करता परिस्थिती हातात घेतली. कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही औपचारिकता न ठेवता त्यांनी नियोजन केले आणि तात्काळ बसची व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यांच्या या तत्पर कृतीमुळे सर्व विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचले.


या एका निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला, पालकांचा जीव भांड्यात पडला आणि शिक्षकांनाही मोठा दिलासा मिळाला. परीक्षेच्या रणधुमाळीत मिळालेला हा आधार विद्यार्थ्यांसाठी निर्णायक ठरला. समाजात केवळ आश्वासनांचे राजकारण सुरू असताना, प्रत्यक्ष कृतीतून मदतीचा हात देणारे नेतृत्व दुर्मिळ होत चालले आहे. अशा परिस्थितीत अतुलभाऊ मराठे यांची भूमिका समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
या सहकार्याबद्दल भैरवनाथ विद्या मंदिर, वराळे यांच्या वतीने शाळा प्रशासनाने अतुलदादा मराठे यांचे जाहीर आभार मानले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले, कि परीक्षेच्या महत्त्वाच्या दिवशी अतुलदादांनी वेळ न दवडता मदत केली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले.

विद्यार्थ्यांनीही भावना व्यक्त करत सांगितले की, वाहन न मिळाल्याने आम्ही खूप घाबरलो होतो; मात्र अतुलदादांमुळे आम्ही वेळेत परीक्षेला पोहोचलो. पालकांनीही संकटाच्या वेळी धावून येणारे नेतृत्व म्हणून अतुलदादा मराठे यांचा उल्लेख केला.
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अडचणीच्या वेळी अतुलदादांची साथ खरी असे सूर उमटत आहेत. केवळ भाषणात नव्हे, तर कृतीतून समाजाशी नाळ जोडणारे नेतृत्वच समाजाला दिशा देते, हे अतुलभाऊ मराठे यांनी पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध करून दाखवले आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















