Homeराजकीयवडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 : नामनिर्देशन अर्ज स्वीकारास सुरुवात, पहिल्या दिवशी...

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 : नामनिर्देशन अर्ज स्वीकारास सुरुवात, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 : नामनिर्देशन अर्ज स्वीकारास सुरुवात, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

वडगाव, ता. मावळ (प्रतिनिधी) : मा. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा प्रारंभ आजपासून (दि. 10 नोव्हेंबर 2025) झाला. नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांसाठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.

सदर निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मनिषा तेलभाते आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. दि. 10 ते 17 नोव्हेंबर 2025 (रविवार दि. 16 नोव्हेंबर वगळता) दरम्यान रोज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात येतील.

नगरपंचायत कार्यालयात उमेदवारांच्या सोयीसाठी एकूण सात टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

टेबल क्र. 1 – अनामत रक्कम पथक

टेबल क्र. 2 – तपासणी पथक (नगराध्यक्ष व प्रभाग क्र. 1 ते 4)

टेबल क्र. 3 ते 5 – तपासणी पथक (प्रभाग क्र. 5 ते 17)

टेबल क्र. 6 – अर्ज स्वीकृती पथक

टेबल क्र. 7 – संगणकीकरण व छपाई पथक

नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उमेदवारांनी https://mahaseccles.in/ या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करून नामनिर्देशनपत्र तसेच शपथपत्र ऑनलाईन पद्धतीने भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वडगाव नगरपंचायत, पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नामनिर्देशन पथकात समावेश करण्यात आला आहे. आज दुपारी 4.00 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थिर व देखरेख पथक (Static Surveillance Team) तसेच भरारी पथक (Flying Squad Team) यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज सुरळीत, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी वातावरण शांत आणि शिस्तबद्ध राहिले. पुढील काही दिवसांत उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्रे दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!