Homeमहत्त्वाचेदेहूरोड आणि कामशेत परिसरात दोन कार पलटी; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

देहूरोड आणि कामशेत परिसरात दोन कार पलटी; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

देहूरोड आणि कामशेत परिसरात दोन कार पलटी; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

देहुरोड:जुना पुणे–मुंबई महामार्गावर (दि. 29) सकाळपासून दोन वेगवेगळ्या अपघातांनी दणाणून गेला. देहूरोड आणि कामशेत या दोन्ही ठिकाणी भरधाव वेगातील कार नियंत्रण सुटून पलटी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये मोठी जीवितहानी टळली.

पहिला अपघात देहूरोड परिसरात पहाटे घडला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने रस्त्यात अचानक अडथळा आल्याने नियंत्रण गमावून पुढील वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्हीही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार दोघांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, दुसरा अपघात कामशेतजवळील त्याच महामार्गावर मुंबईच्या दिशेने जात असताना घडला. भरधाव वेगातील कारचे अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. या घटनेत कोणतीही जखमी वा जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातानंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

दोन्ही अपघातांमुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांनी तातडीने उपाययोजना केल्याने परिस्थिती लवकर सामान्य झाली. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी महामार्गावर वेगमर्यादा पाळण्याचे आणि दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जुना पुणे–मुंबई महामार्गावरील वेग आणि वाहतूक वाढली असल्या मुळे धोका निर्माण होत असल्याने सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्याची गरज असल्याचे स्थानिकांनी मत व्यक्त केले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!