Homeमहत्त्वाचेमावळात बसथांबे ‘लुप्तप्राय’; प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड—प्रवाशांचा जीव मुठीत

मावळात बसथांबे ‘लुप्तप्राय’; प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड—प्रवाशांचा जीव मुठीत

मावळात बसथांबे ‘लुप्तप्राय’; प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड—प्रवाशांचा जीव मुठीत

मावळ : तालुक्यातील बसथांबे अक्षरशः गायब होण्याच्या मार्गावर! जेथे-जेथे थांबे उरले आहेत, त्यांची अवस्था बघून असं वाटतं प्रशासनाने त्यांना ‘जागतिक वारसा’ दर्जा द्यावा, कारण ते लवकरच इतिहासात जमा होतील. लोकप्रतिनिधी आणि पीएमपीएमएल प्रशासनासाठी ही वस्तुस्थिती कितपत भूषणावह आहे, हा प्रश्न आता नागरिक विचारु लागले आहेत मावळाची ओळख ‘गैरसोयीची राजधानी’ म्हणून जगभर पोहोचत चालली आहे, हे नागरिकांच्या अभिमानाचं कारण ठरणार की लाजेचं?

ऊन, पाऊस, थंडी काहीही असो या अव्यवस्थेचा सर्वाधिक फटका बसतो तो विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाच. बसथांबे नसल्यामुळे उघड्यावर उभं राहून प्रवास करणं, हे आज मावळवासीयांचं रोजचं दुःख बनलं आहे. आणि त्यामुळे एकच सवाल सतत ऐकू येतो

लोनावळा–निगडी मार्गावर आधुनिक पद्धतीचे बसथांबे उभारू, असे ठणकावून सांगणारे आमदार–खासदार आज मौनात. आधुनिकता तर सोडाच, साधा पक्का बसथांबा शोधायलाही दुर्बिण लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदही मागे नाही. नागरिकांना मोठमोठी स्वप्नं दाखवत त्यांनी दहा ठिकाणी “स्मार्ट बसथांबे” उभारण्याची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात—ना स्मार्ट बसथांबे, ना कामाचा मागमूस. निधी कुठे गेला? योजना कागदावरच का अडकली? राबवणार कोण?—यांची उत्तरं प्रशासनाकडेही नाहीत आणि नागरिकांकडे तक्रारींचा ढिग मात्र वाढतच आहे.

दरम्यान प्रवासी मात्र आजही त्याच ठिकाणी, त्याच त्रासात उभे. त्यांची आर्त मागणी तशीच “बसथांबे द्या… वचनपूर्ती करा.

मावळ तालुका खऱ्या अर्थाने आधुनिकतेकडे कधी जाणार? की लोकप्रतिनिधींच्या वचनांच्या विहिरीतच अडकून राहणार?

उत्तर मात्र सत्ताधाऱ्यांनाच द्यावं लागेल.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!