Homeक्राईमवडगाव फाटा येथे स्थानिक गोरक्षकांच्या मदतीने ४७ गायी व २९ वासरांची कत्तली...

वडगाव फाटा येथे स्थानिक गोरक्षकांच्या मदतीने ४७ गायी व २९ वासरांची कत्तली पासून सुटका करण्यात आली आहे

वडगाव फाटा येथे स्थानिक गोरक्षकांच्या मदतीने ४७ गायी व २९ वासरांची कत्तली पासून सुटका करण्यात आली आहे

वडगाव मावळ : जुना पुणे मुंबई महामार्गावर वडगाव फाटा येथे वडगाव पोलिसांनी स्थानिक गोरक्षकांच्या मदतीने पाच वाहनांमध्ये दाटीवाटीने भरून कत्तलीसाठी चालवलेल्या ४७ गायी व २९ वासरांची सुटका केली. याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून सुमारे ८७लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

४७गायी व २९ वासरांना कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे= मगर सूर्यवंशी(वय ३९.रा. आदर्श नगर मामुर्डी) दयानंद तारडे(वय २५.रा. समता कॉलनी वराळे ता मावळ) महेश साबळे(वय २४) शिवाजी निवडूंगे(वय २४. दोघेही राहणार रुपीनगर तळवडे) पप्पू शेख(वय ३८.रा. मेथवडे ता सांगोला जी सोलापूर) नितेश उघडे(वय२८.रा. दरवडी जी बीड) श्रीकांत गरड(वय४८) नेताजी लोमटे(वय३६) पवन लोमटे(वय४८. तिघेही राहणार खेड जि धाराशिव) रामराव देशमुख(वय५२.रा. घोडके ता वाशी जी धाराशिव) या १० जणांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईच्या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक २१मे २०२५ रोजी मध्यरात्री स्थानिक गोरक्षकांकडून माहिती मिळाली की वडगाव फाटा येथे वरील नमूद केलेले आरोपी हे पाच टेम्पो मधून सुमारे ४७गायी व २९ वासरे दाटी वाटेने भरून त्यांना श्वास घेता येणार नाही व हवा लागणार नाही अशा पद्धतीने दोरीने बांधून त्यांच्या चारापाण्याची व औषधाची कोणती हि व्यवस्था न करता क्रूरपणे कत्तलीसाठी वाहतूक करत आहे.

पोलिसांनी स्थानिक गोरक्षकांच्या मदतीने सापळा लावून वाहने व जनावरे ताब्यात घेतली. पोलिसांनी या 10 जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सुटका करण्यात आलेली सर्व गाई व वासरे नायगाव व आर्डव (मावळ )येथील गोशाळेत जमा करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशिष काळे पुढील तपास करत आहे. ४७गायी व २९ वासरांची कत्तली पासून मुक्तता केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांचे व स्थानिक गोरक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिनिधी: गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!