Homeक्राईमपुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी आंतरराज्य टोळीचा म्होरक्या बेताब पवार कर्नाटकातून...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी आंतरराज्य टोळीचा म्होरक्या बेताब पवार कर्नाटकातून जेरबंद

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी

आंतरराज्य टोळीचा म्होरक्या बेताब पवार कर्नाटकातून जेरबंद

लोनावळा : महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक पोलिसांना हवा असलेला आंतरराज्य टोळीचा कुख्यात म्होरक्या बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार (रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, लोणावळा मावळ) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी कर्नाटकातील कलबुर्गी येथून जेरबंद करण्यात यश मिळवले. या धाडसी कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बेताब पवार हा गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्यावर अल्पवयीन मुली व महिलांचे अपहरण, मारहाण, अत्याचार, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये लोणावळा येथे त्याच्या टोळीवर विविध गुन्हे नोंदवले गेले होते.

त्यावेळी पोलिसांनी त्याच्या टोळीतील राज सिद्धेश्वर शिंदे व ज्ञानेश्वर लोकरे (दोघे रा. क्रांतीनगर, कुसगाव, लोणावळा) यांना अटक केली होती. मात्र, बेताब पवार मात्र फरार झाला होता.

गुजरातमध्ये त्याच्यावर दोन गुन्हे दाखल असून तो साबरमती कारागृहातून तात्पुरत्या जामिनावर बाहेर आल्यावर पुन्हा गुन्हेगारीकडे वळला होता.

कर्नाटकातदेखील त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचा गुप्त तपास व धडक कारवाई पुणे ग्रामीण पोलिस बेताबचा सतत शोध घेत होते. दरम्यान गुप्त माहिती मिळाल्यानंतर बेताब पवार हा कर्नाटकातील कलबुर्गी येथे असल्याचे समोर आले.

पुणे ग्रामीण पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने कलबुर्गी येथे धाडसी कारवाई केली व बेताब पवारला जेरबंद केले. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग एस.डी.पी.ओ. गजानन टोम्पे, लोणावळा उपविभागीय अधिकारी

या कारवाईत सक्रिय सहभाग: स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघारे, दिनेश तायडे, अधिकारी व अंमलदार : प्रकाश वाघमारे, तुषार भोईटे, सागर नामदास, रईस मुलाणी, राहुल चोरगे, संतोष साठे

(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे)९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!