Homeराजकीयतळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी संतोष भेगडे यांना संधी द्यावी : नागरिकांची...

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी संतोष भेगडे यांना संधी द्यावी : नागरिकांची ठाम मागणी

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अनुभवी व सर्वसामान्यांशी थेट नाळ जोडलेले नगरसेवक संतोष मारूती भेगडे यांना संधी द्यावी, अशी जोरदार मागणी शहरातील विविध सामाजिक, व्यापारी व नागरिक घटकांकडून पुढे येत आहे. नगरविकासाच्या दृष्टीने अनुभवी, कामकाजाची जाण असलेला व लोकाभिमुख चेहरा उपनगराध्यक्षपदी असणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

संतोष भेगडे हे गेल्या अनेक वर्षांपासून नगरपरिषदेत सक्रियपणे कार्यरत असून त्यांनी नगरसेवक म्हणून विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, तसेच नागरी सुविधा या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी ठोस भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कामाची पद्धत ही केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचणारी आहे.

प्रभागातील नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्या तातडीने मार्गी लावण्याचा त्यांचा स्वभाव सर्वपरिचित आहे. सामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक वर्गाशी त्यांचा नियमित संवाद असतो. त्यामुळेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संतोष भेगडे यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची उपनगराध्यक्षपदी आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नगर परिषदेतील कामकाजाची सखोल माहिती, प्रशासनाशी समन्वय साधण्याची क्षमता आणि लोकप्रतिनिधी म्हणून मिळवलेला अनुभव पाहता संतोष भेगडे हे या पदासाठी योग्य उमेदवार असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळेल आणि रखडलेल्या प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

शहराच्या हितासाठी राजकीय समीकरणांपेक्षा कार्यक्षमतेला प्राधान्य द्यावे, अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आगामी उपनगराध्यक्ष निवडीमध्ये संतोष मारूती भेगडे यांना संधी द्यावी, हीच तळेगाव दाभाडेकरांची एकमुखी मागणी ठरत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव फाट्यावर तातडीने सिग्नल सुरू करा; वाहतुकीवर निर्बंधांची शिवसेनेची मागणी १५ दिवसांचा अल्टीमेट 

वडगाव फाट्यावर तातडीने सिग्नल सुरू करा; वाहतुकीवर निर्बंधांची शिवसेनेची मागणी १५ दिवसांचा अल्टीमेट    वडगाव मावळ : वाढत्या वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या वडगाव फाटा परिसरात आता...

तळेगाव दाभाडे येथे 3 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते

तळेगाव दाभाडे येथे 3 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते   तळेगाव दाभाडे : येथील नगर परिषदेच्या वतीने यशवंत नगर परिसरात नव्याने उभारण्यात...

तिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज उत्सवाला वडगाव मावळात भक्तिमय प्रारंभ; पालखी, कुस्त्या व बैलगाडा शर्यतींनी...

तिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज उत्सवाला वडगाव मावळात भक्तिमय प्रारंभ; पालखी, कुस्त्या व बैलगाडा शर्यतींनी रंगली जत्रा   वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव मावळ...

वडगावात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण; शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी सुधारणा...

वडगावात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण; शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी सुधारणा अपेक्षित   वडगाव, ता. मावळ (जि. पुणे) – महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती...

नायगावात गटार व्यवस्थेचा बोजवारा; फुटलेल्या चेंबरमुळे आरोग्यधोका वाढला

नायगावात गटार व्यवस्थेचा बोजवारा; फुटलेल्या चेंबरमुळे आरोग्यधोका वाढला   नायगाव (कामशेत, मावळ) : कान्हे-नायगाव ग्रामपंचायत हद्दीतील नायगाव गावात गटार व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले...

error: Content is protected !!