Homeराजकीयएक मत = दहा ते पंधरा हजार तळेगाव दाभाडे व वडगाव मधे...

एक मत = दहा ते पंधरा हजार तळेगाव दाभाडे व वडगाव मधे निवडणुकीत नोटांचा महापूर

मावळ:तळेगाव दाभाडे नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत निवडणुकीचा ताप चढला असून ऐन थंडीत पैशाचा पाऊस कोसळू लागला आहे. तळेगावमध्ये एका मताचा दर तब्बल दहा हजारांवर पोहोचल्याची चर्चा असून वडगावात तर हा दर पंधरा हजारांच्या घरात गेल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. गावागावात, वाड्यावस्त्यांवर, चहाच्या टपऱ्यांवर या पैशाच्या खेळाची जोरदार चर्चा रंगली आहे.

निवडणुकीतील ‘खरेदी-विक्री’चे हे बाजारू राजकारण लोकशाहीची धज्जी उडवत असल्याची टीकाही नागरिकांकडून होत आहे. मतदारांच्या घरदारी बोऱ्या भरून नोटा घेऊन जाणाऱ्या एजंटांची लगबग वाढली असून काही ठिकाणी ‘डील’साठी मध्यस्थ बसवल्याची माहिती मिळते. मतांच्या या लिलावात अनेकानी उड्या मारल्याचे, तर काही धनदांडग्या उमेदवारांनी तर बोली वाढवण्यासाठी रात्रभर बैठका घेतल्याचे समजते.

लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीत मताला असा दर मिळू लागल्याने प्रामाणिक मतदार त्रस्त आहेत. परंतु मतांचे किमतीचे हे राजकारण कमी होण्याऐवजी उफाळून आल्याने तळेगाव–वडगाव परिसरात निवडणुकीचा माहोल तापला आहे. आगामी निकालात या नोटांच्या पावसाचा परिणाम किती दिसेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!