Homeराजकीय‘मावळ केसरी’च्या उत्कृष्ट नियोजनावर अजितदादांची मोहोर; प्रशांत व मेघाताई भागवत यांचे विशेष...

‘मावळ केसरी’च्या उत्कृष्ट नियोजनावर अजितदादांची मोहोर; प्रशांत व मेघाताई भागवत यांचे विशेष कौतुक

‘मावळ केसरी’च्या उत्कृष्ट नियोजनावर अजितदादांची मोहोर; प्रशांत व मेघाताई भागवत यांचे विशेष कौतुक

वडगाव मावळ, प्रतिनिधी : मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे नुकत्याच पार पडलेल्या बहुचर्चित ‘मावळ केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या भव्य, शिस्तबद्ध व यशस्वी आयोजनाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांत भागवत आणि मेघाताई भागवत यांच्या नियोजन कौशल्याचे अजितदादांनी विशेष कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकतेच मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजितदादांनी आपल्या भाषणात ‘मावळ केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाचा आवर्जून उल्लेख केला.

पैलवानांच्या ‘खुराकाचे’ विशेष कौतुक

नवलाख उंबरे येथे पार पडलेली कुस्ती स्पर्धा ही शिस्तबद्ध नियोजन, उत्तम व्यवस्थापन आणि खेळाडूकेंद्रित सुविधा यांचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत अजित पवार यांनी स्पर्धेत सहभागी पैलवानांना देण्यात आलेल्या सकस व दर्जेदार आहाराची (खुराकाची) मुक्तकंठाने प्रशंसा केली. खेळाडूंना मिळालेल्या सोयी-सुविधांमुळेच स्पर्धेचा दर्जा उंचावल्याचे त्यांनी नमूद करत आयोजकांचे अभिनंदन केले.

सामाजिक कार्याचा गौरव

यावेळी इंदोरी जिल्हा परिषद गटामध्ये प्रशांत भागवत व मेघाताई भागवत यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. सामाजिक बांधिलकी जपत सुरू असलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव करत, पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.

हनुमान मूर्ती देऊन विशेष सन्मान

अजित पवार यांनी केलेल्या या कौतुकाचा स्वीकार करत, ‘मावळ केसरी’चे मुख्य आयोजक प्रशांत भागवत आणि मेघाताई भागवत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शक्तीची देवता हनुमानाची भव्य मूर्ती भेट देऊन विशेष सन्मान केला.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मावळ केसरी’ कुस्ती स्पर्धेमुळे मावळ तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!